انجمن راهنمایان محلی
Bina Apartment Shopping Centre, 1, Sir Mathuradas Vasanji Rd, Azad Nagar, Andheri East, Mumbai, Maharashtra 400053، هند

تصاویر

درحال حاضر تصاویری برای این مکان ثبت نشده است!

نظرات — 2

Mayur Melge
at 2023 Aug 14
Mayur Melge
at 2023 Aug 14
मी रोज कामावर जायच्या आधी बाप्पाचे दर्शन घेतो, खूप छान मंदिर आहे बाप्पाचे, स्वच्छ आणि नीटनेटनेटके. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
Unmesh Zagade
at 2023 Jan 14
Unmesh Zagade
at 2023 Jan 14
।। श्री गणेशाय नमः ।।

श्री वासुदेव रामचंद्र जयकर ट्रस्टचे श्री वाच्छा सिद्धिविनायक मंदिर हे अंधेरी पूर्व स्टेशन परिसरात अंधेरी कुर्ला रोडवर आहे. हे मंदिर ९० वर्षे जुने असून अंधेरी मधील अनेक जुन्या महत्वाच्या मंदिरापैकी हे एक मंदिर आहे. मंदिराची रचना पूर्वाभिमुख आणि प्रशस्त आहे. मंदिराच्या सभोवार तटबंदी असून आतील प्रांगणात फरशी बसविलेली आहे. मंदिरात गाभारा, सभामंडप, नंदी, समोरील प्रशस्त अंगण, इतर देवतांची छोटी मंदिरे आपल्याला पाहता येतील.

मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ आणि शांत आहे. नंदीचे दर्शन घेऊन पुढे जाता सरळरेषेत गाभार्‍यातील देवाचे (श्री गजाननाचे) दर्शन घडते. मंदिरामध्ये श्री गणेशासोबत शंकर, हनुमान, दत्त, देवीच्या मूर्ती आहेत. मंदिरामध्ये संकष्ट चतुर्थी, विनायकी चतुर्थी, अंगारक संकष्ट चतुर्थी, माघी गणेश जयंती नित्यनेमाने साजरे केले जातात आणि श्रीगणेशाची पूजा केली जाते. त्यावेळी अलोट गर्दी जमते. वर्षभर मंदिरात विविध सण उत्सव साजरे केले जातात.

भाविकांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री वाच्छा सिद्धिविनायक मंदिरात मनाला प्रसन्नता लाभते. श्री वाच्छा सिद्धिविनायक तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.

अंधेरी स्टेशनला पूर्वेला उतरल्यावर अगदी २ मिनिटात या गणपती मंदिरात पोहचता येते. मंदिराजवळ गाडी घेऊन जाता येते. हे मंदिर अंधेरी स्टेशन परिसरात असल्याने हा भाग गर्दीचा आणि वर्दळीचा आहे. त्यामुळे येथे पार्किंग उपलब्ध नाही.

जवळचा बस स्टॉप - आगरकर चौक

जवळचे रेल्वे स्टेशन - अंधेरी रेल्वे स्टेशन

जवळचे मेट्रो स्टेशन - अंधेरी पूर्व

مکان های نزدیک

مکان های مشابه

مکان های مرتبط